भरत शहा ः दोन हजार नागरिकांनी घेतला तीर्थयात्रेचा लाभ
इंदापूर – सामाजिक जाणवेतून उमंग प्रतिष्ठान युवक नेते अजिंक्य जावीर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. शहरातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवित आहे.
प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविलेल्या उपक्रमातून तब्बल दोन हजार महिलांनी अक्कलकोट, तुळजापूर देवदर्शनाचा लाभ घेतला. उमंग प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद असल्याचे कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी सांगितले.
उमंग प्रतिष्ठानने युवक नेते अजिंक्य जावीर यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापुरातील प्रभाग क्र.८मधील दोन हजार महिलांना श्रीक्षेत्र अक्कलकोट, तुळजापूर देवदर्शन घडविण्यासाठी २३ वाहनांचे नियोजन केले होते.
देवदर्शनाला जाणाऱ्या वाहनांचे पूजन शहा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गणेश महाजन, अक्षय सूर्यवंशी, आर्षद सय्यद, श्रीनिवास माने, प्रमोद राऊत, सुनील तळेकर, अभिजीत अवघडे, कैलास कदम, ऍड. राकेश शुक्ल, सुनील आरगडे, सागर आरगडे, संदीप चव्हाण, महेंद्र रेडके यांच्यासह शहरातील मान्यवर उपस्थित होते.