रांजणगाव गणपती येथे पदयात्रेचे स्वागत व अन्नदान
रांजणगाव गणपती : जागतिक किर्तीचे भंत ज्ञान ज्योती महाथेरो संघा रामगिरी ताडोबा अभायारण्य चंद्रपूर यांच्या नेतृत्वाखाली मिलिंद कॉलेज छत्रपती संभाजीनगर येथून विजयस्तंभ कोरेगाव भिमाकडे निघालेली पदयात्रा रांजणगाव गणपती येथे आली. यावेळी प्रबुध्द फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक राजकुमार पंचमुख यांच्याकडून पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यांना अन्नदान करण्यात आले.
संविधान बचाओ हा सामाजिक संदेश घेवून निघालेली ही पदयात्रा मिलिंद कॉलेज छत्रपती संभाजीनगर येथून निघाली आहे. त्यांचे प्रत्येक गावात मोठया स्वागत करण्यात आले. पदयात्रेला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता जनमान्यांपर्यंत संविधान बचाओचा सकारात्मक संदेश पोहचल्याचे दिसून येते. रांजणगाव गणपती येथे प्रबुध्द फाऊडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक राजकुमार पंचमुख यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.
सर्व भन्ते, भिक्यू उपासक आणि उपासिका यांना अन्नदान देण्यात आले. पदयात्रेत समावेश झालेल्या भन्तेंकडून धम्मसंदेश ऐकवण्यात आला. संविधान बचाओ हा सामाजिक संदेश घेवून निघालेली ही पदयात्रा प्रत्येक वर्षी नवनवीन सामाजिक संदेश घेवून देशभर भ्रमण करीत आहे.
रांजणगाव गणपती या ठिकाणी प्रत्येकवर्षी प्रबुध्द फाउंडेशनच्या वतीने या पदयात्रेचे नियोजन करण्यात येते. प्रबुध्द फाऊंडेशनच्या वतीने समाजातील अनेक गरजू आणि गरिब कुटुंबियांसाठी मोठी आर्थिक मदत करण्यात येते.