भोर : धांगवडी (ता.भोर) येथे राजगड ज्ञानपीठ संचलित राजगड टेक्निकल कॅम्पस डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी विभागीय स्तरावर विविध स्पर्धेत बाजी मारली आहे.
समर्थ पोलटेक्निक बेल्हे येथे झालेल्या अॅथलेटिक्स या झोनल लेवल स्पोर्ट इव्हेंटमध्ये आपल्या राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस डिप्लोमा विभागात प्रथम क्रमांक श्वेता राऊत (थाळी फेक), प्रथम क्रमांक, अश्विनी साळुंखे (भालाफेक), प्रथम क्रमांक, पायल गायकवाड (२०० मीटर रनिंग) तृतीय क्रमांक, श्रेया राऊत (लांब उडी) प्रथम क्रमांक, शिव मरगजे ( थाळी फेक) तृतीय क्रमांक,शर्वरी चव्हाण (२०० मीटर रनिंग) प्रथम क्रमांक, श्वेता राऊत,पायल गायकवाड, पुजा गायकवाड, शर्वरी चव्हाण (४०० मीटर रिले) मिळविला.
तसेच जे एस पी एम पोलटेक्निक ताथवडे येथे चेस या झोनल लेवल स्पोर्ट इव्हेंटमध्ये चेस या झोनल लेवल स्पोर्ट इव्हेंटमध्ये द्वितीय क्रमांक, शिंदे समीक्षा,शिरोळे सुरुची, ननवरे ज्ञानेश्वरी,
समगीर ईश्वरी यांनी यश मिळवले. प्राचार्य ज्ञानेश्वर खोपडे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल राजगड ज्ञानपीठ कार्याध्यक्ष,आमदार संग्राम थोपटे,मानद सचिव स्वरुपा थोपटे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांंचे अभिनंदन केले.