आरक्षण सोडत जाहीर ः 17 पैकी 9 जागा महिला राखीव
मंचर – मंचर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी वार्ड निहाय आरक्षण सोडत भूसंपादन अधिकारी रोहिणी आखाडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगर पंचायतीचे मुख्य अधिकारी मनोज पाष्टे यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 13) मंचर नगर पंचायत कार्यालयात करण्यात आली. एकूण 17 पैकी महिलांसाठी 9 जागा राखीव आहेत. एका प्रभागात 1 उमेदवार निवडून द्यायचे आहेत.
आरक्षण सोडत कार्यक्रम प्रसंगी लाला अर्बन बॅंकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले, माजी सरपंच दत्ता गांजाळे, कॉंग्रेस आय पक्षाचे तालुकाध्यक्ष राजू इनामदार, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, अविनाश रहाणे, स्वप्निल बेंडे पाटील, प्रवीण मोरडे, गणेश खानदेशे, धनेश मोरडे, विकास बाणखेले, सुहास बाणखेले, संदीप बाणखेले, सुशांत थोरात, गणेश बाणखेले,, यांच्यासह विविध पक्षाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
आरक्षणाच्या चिठ्या काढण्यासाठी जिल्हा परिषद मराठी शाळेच्या मुलींना येथे आणण्यात आले होते. हरकती व सूचना आरक्षण सोडत कालावधी मुख्य अधिकारी मंचर नगरपंचायत यांच्याकडे अथवा निवडणूक कार्यालय मंचर नगरपंचायत यांच्या कार्यालयात दि. 15 ते 21 जून दुपारी 3 वाजेपर्यंत सादर कराव्यात असे आवाहन मंचर नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी मनोज पष्टे यांनी केले.
दिग्गजांना दुसरा वार्ड शोधावा लागणार
माजी सरपंच दत्ता गांजाळे हे यापूर्वी ज्या ठिकाणाहून निवडून आले तो वार्ड क्र. 3 महिलांसाठी राखीव झाला आहे, तेथे पत्नीला तर ते स्वतः मतदान आहे त्या वार्ड क्र. 2 मधून उभे राहणार आहेत. ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि लाला अर्बन बॅंकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले यांचा वार्ड क्रमांक एक महिला राखीव झाला आहे. कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजू इनामदार यांचा वार्ड क्रमांक आठ, नऊ आणि 13 महिलांसाठी राखीव झाला असला तरी वार्ड क्रमांक 2 मधून उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी सदस्य लक्ष्मण थोरात आणि मंचर सोसायटीचे संचालक गणेश खानदेशे यांचा वार्ड क्रमांक पाच महिला राखीव झाला आहे.