आळंदीतील मान्यवरांच्या हस्ते ध्वजवंदन : कला-क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान
आळंदी : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय व कनिष्ट महाविद्यालयामध्ये संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर यांच्या हस्ते ध्वजवंदन कऱण्यात आले. श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर व श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिरच्या ध्वजाचे ध्वजारोहण संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय समिती सदस्य योगेंद्र कुऱ्हाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे संस्थापक सुधीर मुंगसे, माजी सभापती (शिक्षण मंडळ आळंदी नगरपरिषद), श्रीधर कुऱ्हाडे, बाबूलाल घुंडरे, मोरे काका, पालक – शिक्षक संघाचे सहसचिव उद्धव डिघोळे, शिवकन्या मोरे, संगीता फपाळ, प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, मुख्याध्यापक प्रदीप काळे, पर्यवेक्षक किसन राठोड, अनिता गावडे, दत्तात्रय वंजारी, शिवाजी जाधव, श्रीरंग पवार, रामदास वहिले, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कला-क्रीडा युवा महोत्सवानिमित्ताने खोखो, डॉजबॉल, रांगोळी अशा सांघिक स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मानचिन्ह देऊन मान्यवरंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रथमेश जाधव व पारस भोईर या विद्यार्थ्यांनी नदीत बुडणाऱ्या महिलांना वाचविल्याबद्दल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अजित वडगावकर यांनी प्रास्ताविक केले.
दरम्यान, माजी विद्यार्थी सुधीर मुंगसे म्हणाले की, मी विद्यालयाचा माजी विद्यार्थी असून, या विद्यालयातील शिक्षकांनी आम्हाला चांगले संस्कार दिले. त्यामुळेच आम्ही आज जीवनामध्ये यशस्वीरित्या वाटचाल करत आहोत. शाळेच्या भौतिक विकासासाठी योगदान देण्याचे जाहीर केले. गणेश लिखे यांनी सूत्रसंचालन केले. दीपक मुंगसे यांनी आभार मानले.