सासवड येथील मुख्याधिकारी चव्हाण यांचा इशारा
सासवड – सासवड शहरात उघड्यावर कचरा टाकल्यास होणार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांनी दिला. जर उघड्यावर कचरा टाकलेचे निदर्शनास आले तर संबंधित नागरिकांकडून ५०० रुपये इतकी दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
सासवड नगरपरिषदेच्या वतीने सासवड शहरातील सर्व सोसायट्यांमधील अध्यक्ष व सचिव यांची बैठक घेऊन यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी शहरात उघड्यावर कचरा टाकणे, रस्त्यावर राडारोडा टाकणे, घंटागाडीत कचरा न टाकता इतरत्र कचरा टाकणे, शहराच्या स्वच्छतेमध्ये व पर्यावरण संवर्धनामध्ये सोसायट्यांचा सहभाग आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीचे नियोजन मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्या अंतर्गत करण्यात आले. बैठकीमध्ये आरोग्य विभाग प्रमुख मोहन चव्हाण यांनी सर्व सोसायट्यांनी कचरा कोणीही उघड्यावर टाकू नये याबाबत जनजागृती करून नगरपरिषदेस सहकार्य करावे.
सोसायट्यांमधील स्वच्छता, कचरा विलगीकरण, वृक्षारोपण, रेनवॉटर हार्वेस्टीग, सोलार प्लॅट उपलब्धता, कचर-यापासून खत निर्मिती करणे आदी विषयावर स्पर्धेचे नियोजन करण्यात येणार असून प्रथम तीन सोसायट्यांना बक्षिस वितरण करण्यात यावे अशी सोसायटीधारकांनी मागणी केली. सर्व सोसायटीधारकांनी समस्या आणि केलेल्या उत्कृष्ट कामाबाबत माहिती दिली.
सहारा सिल्व्हर सोसायटीचे अध्यक्ष नितीन घाडगे म्हणाले की, सहारा सिल्व्हर सोसायटीमध्ये वॉटर हार्वेस्टींग प्लान्ट उभारल्याने तेथील पाच बोअरवेलला पाणी भरपूर असून त्याचा वापर सोसायटीमधील लावलेल्या झाडांना होतो. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासत नाही. सोसायटीमधून निघणा-या कच-ऱ्यावर जागेवर प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मिती केली जाते. 25 किलोवॅटच्या सोलार प्लॅट उभारणार असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ. कैलास चव्हाण, आरोग्य विभाग प्रमुख मोहन चव्हाण, शहर समन्वयक राम कारंडे, सोसायटीधारक महेश जगताप, संतोष मुळीक, राहुल धर्माधिकारी, दामोदर ढोकणे, नितीन घाडगे, चंद्रशेखर मुसळगी, प्रकाश मेमाणे, अविनाश जाधव, चंद्रकांत कुंभार, भूषण मचाले आदी मान्यवर उपस्थित होते.