मलठण : वार्ताहर: दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डी (मूगाव) येथील महेंद्र पासलकर यांची भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे यांच्या मार्गदर्शनात महेंद्र पासलकर यांची निवड करण्यात आली. गेल्या अनेक वर्षापासून भाजपाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत असल्याने सामाजिक प्रश्नावर आवाज उठून सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे. जनसेवेसाठी सदैव तत्पर असणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
महेंद्र पासलकर यांनी या पूर्वी सरचिटणीस पुणे शहर भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा,माजी कार्याध्यक्ष थरमॅक्स कामगार, संघटनासदस्य श्रमिक एकता महासंघ इंडस्ट्री ऑल ग्लोबल,सरचिटणीस पुणे शहर भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा या विविध पदांवर काम केले आहे.त्यांना त्यांचे वडील कै. नारायण पासलकर यांच्याकडून राजकीय व सामाजिक वारसा लाभला आहे.
भाजपच्या माध्यमातून त्यांनी आजवर केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर पक्षातर्फे नवीन जबाबदारी देण्यात आली. त्यांच्या या निवडीमुळे भाजपा कार्यकर्तेमध्ये उत्साह दिसून येते आहे. याप्रसंगी कामगार मंत्री सुरेश खाडे तसेच महाराष्ट्र प्रदेश कामगार मोर्चा अध्यक्ष विजय हरगुडे, प्रदेश सरचिटणीस हनुमंत लांडगे , प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब टेमकर , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुधाकर जांभळे आदी मान्यवर उपस्थित होते.