आमदार संजय गायकवाडांचा नोंदवला निषेध
तळेगाव ढमढेरे : राज्यात सुरू असेलेला आरक्षण संघर्ष मराठा बांधवाना आरक्षण ओबीसीमधून न देता स्वातंत्र आरक्षण द्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्याचे अन्नपुरवठा मंत्री व ओबीसी नेते छगनराव भुजबळ यांनी एल्गार पुकारला आहे. यासाठी पाठिंबा देण्यासाठी तळेगाव ढमढेरे येथील ओबीसी बांधवानी महारॅली काढत पाठिंबा दिला. यावेळी भुजबळ यांच्यावर टीका करणारे आमदार संजय गायकवाड यांच्या फोटोला जोडे मारत निषेध केला.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर ओबीसींचे आरक्षण बचावाच्या मागणीसाठी ओबीसी समाज संघटना एकटवटून आणखी आक्रमक झाल्या आहेत. मराठा आंदोलनाच्या यशानंतरचा पहिलाच आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा असल्याने तळेगाव ढमढेरे येथील ओबीसी बांधवांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार उपसमितीच्या आवारातील महात्मा ज्योतीराव फुले यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसी समाजाचा विरोध नाही. परंतु ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये.
मराठा समाजाला स्वतंत्र वर्गातून आरक्षण द्यावे ही भूमिका ओबीसी समाजाची आहे. काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाचा ड्राफ्ट राज्य सरकारकडून जाहीर झाल्यानंतर ओबीसी समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नगरमध्ये ओबीसींची पहिली सभा पार पडली.
तळेगाव ढमढेरे बाजार पेठेमार्गे रॅली गावप्रदक्षिणा करून अहमदनगर येथे होणार्या ओबीसी एल्गार मेळाव्यासाठी ओबीसी बांधव रवाना झाले. तळेगाव ढमढेरे राजकीय कलह बाजूला ठेवत ओबीसी सर्वपक्षीय नेते एकत्र येत महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला होता.