नारायणगाव : अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील राष्ट्रदैवत प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नारायणगाव (ता. जुन्नर) येथील ग्रामदैवत मुक्ताई मंदिर परिसरात प्रभू श्रीराम व मंदिराची 30 फूट उंचीची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
उभारण्यात आलेल्या प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे अनावरण नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर भाविकांनी महाआरती केली असून जय श्री रामाच्या घोषणांनी नारायणगाव नगरी राममय झाली.
मुक्ताबाई तरुण मित्र मंडळ, गणेशभाऊ वाजगे, निलेश जंगम, दर्पण पवार, यश सरोदे मित्र परिवारांच्या वतीने हे प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
यावेळी ब्राह्मण संघातील महिला, बजरंग दल, शंभुराजे युवा मंच, मुक्ताबाई तरुण मित्र मंडळ, संतोष वैद्य, अशोक तिवारी, विलास पानसरे, राजेंद्र मेहता, दिवान पटेल, जयेश कोकणे, हितेश कोराळे, अमर वाजगे, अतुल वाजगे, सचिन सुर्वे, अनिकेत पाटे, अभिजीत वाजगे, मुकेश वाजगे, अनिकेत कोर्हाळे,
बाबू विटे, ऋषी वाजगे, सागर दरंदाळे आदी मान्यवर उपस्थित होते. श्री रामाची तीस फूट उंचीची प्रतिमा खास आकर्षण बनले असून दर्शनासाठी आलेला भाविक सेल्फी घेतल्याशिवाय येथून जात नाही. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास अभंग, प्रास्ताविक अजिंक्यतारा पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश वाजगे, ब्राह्मण संघाचे अध्यक्ष उमेश अवचट यांनी तर निलेश जंगम यांनी आभार मानले.