रांजणगाव गणपती – मराठायोद्धे मनोज जरांगे पाटील यांनी कारेगाव रांजणगाव हद्दीतील मैदानावरील सभा आटोपल्यानंतर रांजणगावच्या दिशेने प्रस्थान केले. यावेळी रांजणगाव येथील ग्रामस्थांनी व रांजणगाव महागणपती देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.
मनोज जरांगे पाटील यांनी मनोभावे दर्शन घेऊन आरती केली. या नंतर विश्वस्त मंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. रांजणगाव येथील राजमुद्रा चौकापासून ते महागणपती मंदिरांपर्यत मनोज जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी व त्यांना औक्षण करण्यासाठी अलोट गर्दी जमली होती.
रांजणगाव सह परिसरातील व औद्योगिक वसाहतीमधील लाखो भाविक यावेळी रस्त्याच्या दुतर्फा त्यांच्या स्वागताला उभे होते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने मनोज जरांगे यांना दोनशे किलोचा हार घालून व जेसीबी व पोकलेनमधून फुलांची उधळण करुन स्वागत करण्यात आले. यानंतर जरांगे पाटील यांनी महागणपती मंदिरात दर्शन घेऊन पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले.
दरम्यान ढोकसांगवी सोसायटीचे माजी चेअरमन सुहास मलगुंडे व उद्योजक सचिन मलगुंडे यांनी ही शिरुर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या उपस्थितीत जरांगे पाटील यांचे स्वागत करुन समवेत आलेल्या नागरिकांना नाष्ट्याची सोय उपलब्ध करुन दिली. यावेळी देवस्थानचे विश्वस्त मंडळ मुख्य विश्वस्त ओमकार देव, अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील, उपाध्यक्ष संदिप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर, तसेच पुजारी प्रसाद कुलकर्णी,
मकरंद कुलकर्णी, युवासेना जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे, मनसेचे तालुकाप्रमुख नानासाहेब लांडे, उपसरपंच श्रीकांत पाचुंदकर पाटील, राजमुद्रा पतसंस्थेचे चेअरमन दत्ताञय पाचुंदकर पाटील, महेश फंड ग्रामपंचायत सदस्य अनिल दुंडे निलेश लांडे, विलास बत्ते, आकाश बत्ते, किशोर टावरे, कुमार नाणेकर, सचिन दुंडे, सोमनाथ बांदल, रोहन लांडे तुषार शेळके यांसह ग्रामस्थ महिला भगिनी, देवस्थान कर्मचारी कामगार वर्ग रांजणगाव पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.