शिक्षक संघाचा उपक्रम : कपडे व दिवाळी खाऊ वाटप
टाकळी हाजी – अखिल शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने अनाथांची माय, पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या शिरुर येथील मनःशांती छात्रालय येथे अनाथ मुलांबरोबर दिवाळी साजरी केली. अखिल शिक्षक संघातर्फे दरवर्षी दिवाळीत हा उपक्रम राबविला जात आहे.
यावेळी 80 विद्यार्थी हजर होते. विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य देऊन मुलांना व सर्व कर्मचारी वर्गाला शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विनय सकपाळ यांनी स्वागत केले. अखिल शिक्षक संघाचे नेते शिवाजीराव वाळके, राज्य उपाध्यक्ष अनिल महाजन, शिवव्याख्याते प्रा. डॉ. शाकुराव कोरडे, अध्यक्ष अशोक पठारे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा. साधना खोमणे,
शिक्षक पतसंस्थेच्या उपसभापती शर्मिला निचित, सरचिटणीस सुरेश थोरात, धनंजय जाधव, संचालक संदीप थोरात, तज्ज्ञ संचालक सुभाष कोरडे, ह.भ.प बिभीषण गांजे, संतोष रणसिंग यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यकारी संचालक नवनाथ निचित, संचालक गोपीनाथ जाधव, अरुण खोमणे, संचित वाळके, डॉ. अपूर्वा खोमणे, निकिता निचित, निकिता जाधव, सुमन पठारे उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश पवार यांनी केले. अर्जुन निचित यांनी आभार मानले.