राज्यभरातून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद : गुरुवारी निकाल
बारामती – येथील लडकत अकॅडमीने आयोजित केलेल्या पहिल्या टप्प्यातील स्कॉलरशिप परीक्षेला राज्यभरातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुसर्या टप्प्यातील परीक्षा दि. 14 जानेवारी रोजी होणार असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक नामदेव लडकत यांनी केले आहे.
स्कॉलरशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दरवाजे खुले करणार्या लडकत अकॅडमीची स्कॉलरशिप परीक्षा रविवारी (दि. 24) उत्साहात पार पडली. 10 वी मध्ये शिकत असणार्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 11 वी विज्ञान, एनईईटी/जेईई, एमएचटी-सीईटी प्रवेशासाठी लडकत शिष्यवृत्ती 2024 परीक्षेचे आयोजन दरवर्षी केले जाते.
यंदाही स्कॉलरशिप परीक्षा चार्जिंग करण्यात आले होते. राज्यभरातून अनेक विद्यार्थी या परीक्षेसाठी उपस्थित राहिले. सी.बी.एस.सी तसेच स्टेट बोर्ड विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेद्वारे विद्यार्थांना 11 वीएनईईटी/जेईई, एमएचटी-सीईटी आदी स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारी साठीच्या प्रवेशा करिता रुपये 2 लाखपर्यंत स्कॉलरशिप दिली जाणार आहे. येत्या गुरुवारी (दि. 28) या परीक्षेचा निकाल घोषित केला जाणार आहे. तसेच या परीक्षेचा दुसरा टप्पा दि. जानेवारी 2024 रोजी पार पडेल.
“फक्त परीक्षेसाठी अभ्यास न करता या स्पर्धेच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्यानी शिकवलेला विषय योग्य आकलन करून समजून घेऊन अभ्यास केला पाहिजे.आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सेक्युरिटी आदी फील्डमध्ये नवनवीन संधी विद्यार्थ्यानी काबीज केल्या पाहिजेत. विद्यार्थी व पालकांनी याबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे. सकारात्मक वृत्ती महत्त्वाची आहे.”
– नामदेव लडकत, संचालक, लडकत अकॅडमी, बारामती