राजगुरूनगर – खेड-आळंदी विधानसभेचे भावी आमदार म्हणून भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख यांच्या समर्थकांनी तालुका भर फ्लेक्स लावुन मतदारांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे तालुक्यातून जाणार्या पुणे-नाशिक महामार्गाच्या आजूबाजूला देशमुख यांच्या होर्डिंगवर मतदार संघातील तसेच बाहेरील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
अतुल देशमुख यांचा मंगळवारी (दि 16) वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्या गावोगावच्या कट्टर समर्थकांनी खेड तालुक्यात राजगुरुनगर, चाकण, आळंदी, वाडा, पाईट, कडूस, चाकण एमआयडीसी, वाफगाव डेहणे या गावासह तालुक्यातील गावागावात गाव पातळीवर भावी आमदार असे ठळक अक्षरात छपाई करुन आकर्षक फ्लेक्स चौकाचौकात झळकावून जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार असुनही मतमोजणीत अतुल देशमुख यांनी सुरुवातीच्या 19 फेर्यांमध्ये पहिल्या, दुसर्या क्रमांकावर राहुन प्रस्थापितांना धक्का दिला होता. अतुल देशमुख यांनी यापूर्वी राजगुरूनगर ग्रामपंचायतीत यशस्वी सरपंच म्हणून काम केले आहे. जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून तालुक्याच्या कानाकोपर्यात विकासकामे केली.
राजगुरूनगर नगरपरिषद अस्तित्वात आल्यावर त्यांनी राजगुरूनगरसह चाकण, आळंदीमध्ये आपल्या समर्थकांना संधी देऊन नगराध्यक्ष, नगरसेवक पदावर बसवले. गावोगावच्या ग्रामपंचायत, सोसायटीत कार्यकर्त्यांना निर्णायक बळ दिले होते देत आहेत. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पॅनलचे यशस्वी नेतृत्व करून प्रस्थापितांना घाम फोडला होता. उत्तम संघटक, दमदार खेळी आणि धक्कादायक नियोजन असे अनोखे नेतृत्वगुण अतुलभाऊ यांनी जोपसल्याचे तालुक्याने या राजकीय घडामोडी द्वारे अनुभवले आहेत.
एखाद्याच्या पाठीशी उभे रहाणे म्हणजे काय असते ते अतुल भाऊ देशमुख यांच्या माध्यमातून तालुक्याने अनुभवले आहे. म्हणुनच आजच्या तरुणाईला त्यांची व त्यांच्या कार्याची आवड निर्माण झाली आहे. युवकांची मोठी फळी देशमुख यांच्या मागे असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.
नेत्यांना पब्लिक टच देण्याचा प्रयत्न
विधानसभा निवडणुकीला अद्याप वर्ष बाकी आहे. मात्र लोकसभा झाल्याबरोबर विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर देशमुख समर्थकांनी तालुक्यात जोरदार मोर्चबांधणी केली आहे. खेड तालुक्यात विधानसभा निवडणूक समोर ठेऊन शक्तिप्रदर्शन होऊ लागले आहे. त्यात बैलगाडा शर्यती, वाढदिवसाचे जोरदार आयोजन, लग्न, दशक्रिया विधीच्या माध्यमातून जंगी उपस्थिती. त्यात आणखी बड्या नेत्यांची हजेरी याद्वारे इच्छुकांच्या समर्थकांकडून आपल्या नेत्यांना पब्लिक टच देत तालुक्यातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
समर्थकांनी कसली कंबर
भाजप नेते अतुल देशमुख यांच्या गावोगावच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांना भावी आमदार असे म्हटल्याने देशमुखांची विधानसभा तयारी वर्षभर अगोदरच सुरू झाल्याचे मानले जात आहे. महायुतीचे आघाडीचे उमेदवार म्हणून अतुल देशमुख यांचा राजकिय दबदबा तालुक्यात निर्माण झाल्याचे चित्र आहे. अतुल देशमुख यांना 2024 मध्ये आमदार करण्यासाठी तालुक्यातील समर्थकांनी कंबर कसल्याचे सध्याच्या वातावरणातून जाणवत आहे.