ताथेवाडीतील कार्यकर्त्यांनी सोडली “पंजा’ची साथ
सासवड – ताथेवाडी (सासवड, ता. पुरंदर) येथील सामाजिक कार्यकर्ते आणि आमदार संजय जगताप यांचे समर्थक अनिकेत जगताप यांनी कॉंग्रेसला राम राम ठोकत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्यासह अनेक युवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने कॉंग्रेससाठी हा धक्का मानला जात आहे. माजी राज्यमंत्री आणि शिवसेनेचे नवनियुक्त उपनेते विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम ताथेवाडी येथे पार पडला.
जगताप हे सासवड शहरातील व्यावसायिक आहेत. त्यांच्या प्रवेशाने शिवसेनेला बळ मिळणार आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, उमेश गायकवाड, शहरप्रमुख डॉ. राजेश दळवी, नगरसेवक सचिन भोंगळे, अस्मिता रणपिसे, नियोजन समितीचे माजी सदस्य कुंडलिक जगताप, युवासेनेचे अध्यक्ष मंदार गिरमे, नितीन कुंजीर, प्रशांत वांढेकर, मंगेश भिंताडे, मिलिंद इनामके, सुरज माने, ओंकार जगताप, अविनाश बडधे, अक्षय कामठे, सागर मोकाशी, धनंजय म्हेत्रे, गणेश इनामके, राजेश शिंदे, आदेश जाधव, अनिकेत जगताप, तेजस भोंडे,
आदेश साळुंखे, रोहित ताम्हाणे, स्वप्नील गायकवाड, रुपेश वढणे, सौरभ म्हेत्रे, बबलू झुरंगे, हेमंत कामठे, ओंकार जाधव उपस्थित होते. जगताप म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवतारे यांच्या नेतृत्वावर, कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन आम्ही युवकांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात तालुक्यात परिवर्तन होणार असून शिवतारे यांच्या नेतृत्वाशिवाय तालुक्याला पर्याय नाही हे मागील तीन वर्षात लोकांना जाणवले आहे.
मागील अडीच तीन वर्षांत तालुक्यात विकासाचा खेळखंडोबा झाल्याने युवकांचा आणि सामान्य माणसाचा भ्रमनिरास झाला आहे. तालुक्यातील महत्त्वाचे प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळात पळवले गेले. आमदारांनी पुरंदरशी गद्दारी करत बारामतीशी इमान ठेवले. आपल्या हक्काचे विमानतळ, गुंजवणीचे पाणी आणि राष्ट्रीय बाजार हे प्रकल्प पळवण्याचा प्रयत्न झाला; मात्र राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्तांतर झाल्यानंतर हे सगळे प्रकल्प पुन्हा तालुक्यात आणण्यात यश आले.
– विजय शिवतारे, माजी राज्यमंत्री