इंदापूर : कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर आयोजित भव्य कृषी जनावरे प्रदर्शन घोडेबाजार व डॉग शो दि. 24 ते 28 जानेवारी कालावधीत आयोजित केला असून, राज्यातील विविध भागातून तसेच राज्याच्या बाहेरून देखणे अश्व, घोडे दाखल झाले आहेत.
या अश्वांचे स्वागत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तसेच बाजार समितीचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व बाजार समितीचे सभापती विलासराव माने यांनी केले आहे.
राज्यात इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा घोडेबाजार प्रसिद्ध असून, यंदाच्या घोडेबाजारात ऑल इंडिया चॅम्पियन एक कोटी रकमेचा रिबेल घोडा या घोडेबाजाराचे आकर्षक असणार आहे.
राज्याच्या बाहेरून अश्वांची संख्या घोडेबाजारासाठी यंदा मोठ्या प्रमाणात बाजार समितीच्या आवारात आलेली दिसते. येथील बाजार समितीने घोडेबाजार व डॉग शोसाठी जनावरे प्रदर्शनासाठी सर्व सुख सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे म्हणाले, इंदापूर बाजार समितीचा कृषी महोत्सव शेतकरी वर्गासाठी, नागरिकांसाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच पशुपालक यांच्यासाठी अनोखी पर्वणी ठरणारा असतो.
बाजार समितीचे संचालक मंडळ तालुक्यातील शेतकरी वर्गांना व नागरिकांना या महोत्सवातून नावीन्यपूर्ण माहिती शेतीची माहिती, जनावरांचे प्रदर्शन घोड्यांचा बाजार, उपलब्ध करून देण्यामध्ये यशस्वी कामगिरी बजावले आहे.
कृषी महोत्सवासाठी तालुक्यातील शेतकर्यांनी नागरिकांनी विद्यार्थी वर्गांनी महिला भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.