अकोले – भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आ. वैभवराव पिचड , अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष जावेद जहागिरदार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या अकोले तालुकाध्यक्षपदी प्रा.सलिम शेख तसेच तर उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्षपदी तोफिक शेख व नाजीम शेख यांची निवड करण्यात आली.
तिन्ही पदाधिकारी माजी आ. वैभवराव पिचड यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. तसेच सलीम पठाण, फिरोज पठाण व कासम मणियार यांची भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या जिल्हा चिटणीस म्हणून निवड करण्यात आली आहे. उत्तर नगर जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी फत्तु सय्यद, नगरसेविका तमन्ना शेख,
जावेद जहागिरदार, अन्सार पठाण, मोसीन शेख, सीए आसिफ शेख, अब्दुल इमानदार (संचालक बाजार समिती), हुसैन मन्सुरी, सांडू शेख, जुबेर शेख, मोसीन पठाण व आय्युब तांबोळी यांची निवड करण्यात आली. अकोले शहराध्यक्षपदी मोहसिन शेख यांची वर्णी लागली आहे.