किलोला प्रतवारीनुसार १६० ते २०० रुपये ः शेतक-यांमध्ये समाधान
मंचर – सध्या फ्लॉवरला चांगला बाजारभाव मिळत आहे. दीड महिन्यांपूर्वी दहा किलोसाठी 60 ते 100 रुपये बाजार भाव होता; परंतु आता बाजारभावात चांगली सुधारणा होऊन प्रतवारीनुसार 160 ते 200 रुपये भाव फ्लॉवर उत्पादकांना मिळत असल्याने फ्लॉवर उत्पादकानी समाधान व्यक्त केले.
आंबेगाव तालुक्यातील कळंब, चांडोली, पारगाव शिंगवे, निरगुडसर, नांदूर, टाकेवाडी, घोडेगाव, अवसरी इत्यादी गावांमध्ये फ्लावरचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. फ्लॉवरचे उत्पादन साधारण 45 ते 60 दिवसांत विक्री योग्य होते. एकरी साधारण फ्लॉवर रोपापासून खत, औषधे, मजुरी असा सुमारे ४० ते ५० हजार रुपये खर्च येतो.
गेल्या दीड महिन्यात फ्लॉवरचे बाजारभाव दहा किलोसाठी प्रतवारीनुसार ६० ते १०० रुपयांपर्यंत होते, त्यामुळे फ्लॉवर उत्पादन घेणे किंवा त्याची काढण्यासाठी विक्री करणे शेतकऱ्यांना परवडत नव्हते, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी फ्लॉवर पिकात जनावरे सोडली होती. त्यामुळे तोटा झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले; परंतु सध्या फ्लॉवर पिकाला चांगली बाजारभाव मिळत आहे.
बाजारात फ्लावरला 180 ते 200 रुपये जरी बाजारभाव मिळत असला तरी मॉलमध्ये मात्र वीस पंचवीस रुपये अधिक बाजारभावाने फ्लॉवरची विक्री होत आहे. फक्त त्यासाठी फ्लॉवरची प्रतवारी चांगली असली पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी खर्चात आणि उत्पादन घेणाऱ्या पिकांकडे वळाले पाहिजे.
उषा कानडे, सरपंच, कळंब