मराठी करून घेण्यासाठी मनसेकडून उद्याचा अल्टिमेटम
जेजुरी – कुलदैवत खंडेरायाच्या नगरीमध्ये सुमारे 70 पेक्षा अधिक दुकाने आस्थापनांवर इंग्रजीच्या पाट्या आहेत. गुरुवार (दि. 30) तारखेपर्यंत या पाट्या मराठीत कराव्यात, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा तालुकाध्यक्ष उमेश जगताप यांनी दिला आहे.
याबाबतचे निवेदन नगरपालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांना दिले आहे. तसेच जेजुरी पोलीस ठाण्यातही निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.
राज्यातील सर्व आस्थापनेवर व दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात असे हायकोर्ट मुंबई यांचे आदेश व सूचना आहेत.याबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही मराठी पाट्या लावण्याचा इशारा व आवाहन केले आहे , त्यानुसार जेजुरी नगरीतही दुकानदार व व्यावसायिकांनी 30 नोव्हेंबर पर्यंत मराठी पाट्या करून घ्याव्यात अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असे या निवेदनात म्हटले आहे.