पुणे – क्रेडाई महाराष्ट्र प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात छ. संभाजीनगर संघावर मात करत कोल्हापूर संघाने ४ गडी राखून विजय पटकावला. डेक्कन जिमखाना मैदान येथे हा निर्णायक सामना रंगला. ही लढत अखेरपर्यंत चुरशीची ठरली.
स्पर्धेनंतर क्रेडाई-नॅशनलचे कार्यकारिणी सदस्य शांतिलाल कटारिया, एचडीएफसीचे बिझनेस हेड कार्तिक अय्यर, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य सचिन मुळे यांच्या हस्ते विजयी संघास ‘सीएमपीएल करंडक’ देऊन गौरविण्यात आले. यावेळी क्रेडाई-नॅशनलचे उपाध्यक्ष सुनील फुरडे, क्रेडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष राजीव परीख, अध्यक्ष प्रमोद खैरनार, सचिव विद्यानंद बेडेकर, उपाध्यक्ष सुनिल कोतवाल, अदित्य जावडेकर, सहसचिव रविंद्र खिल्लारे, दिनेश ढगे, शांताराम पाटील, आशिष पोकर्णा, धर्मवीर भारती आणि सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज अमित सिंह ( इचलकरंजी), उत्कृष्ट गोलंदाज श्रीराम पाटील (कोल्हापूर), उत्कृष्ट यष्टिरक्षक अमरीश हाऊझवाला (छ. संभाजीनगर) , मालिकावीर जयेश नरवडे पाटील (छ.संभाजीनगर), अंतिम सामन्यातील उत्कृष्ट स्पर्धक अतुल भालेकर या स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून छत्रपती संभाजीनगर संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला व त्यांनी ११७ धावांचे आश्वासक लक्ष्य प्रतिस्पर्धी संघासमोर माफक आव्हान उभे आले. या धावांचा पाठलाग करताना कोल्हापूर संघाने १५ षटकातच लक्ष्य पार केले. क्रेडाई महाराष्ट्राच्या या स्पर्धेत राज्यभरातील शहरनिहाय २२ बांधकाम व्यावसायिक संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
यातून स्वतःला सिद्ध करत छ. संभाजीनगर आणि कोल्हापूर हे दोन संघ अंतिम सामन्यात आमने सामने आले. या स्पर्धेतील नॉक राऊंडचे यजमानत्व पुणे क्रेडाई मेट्रोने स्वीकारले होते. एचडीएफसी बँक या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक होते किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, लीड प्लस, भारती & गित्ते ग्रुप, कालिका स्टील हे सहयोगी प्रायोजक होते. संपूर्ण सीएमपीएल २०२३ च्या यशस्वीतेसाठी अमित वाघमारे, संकेत तुपे व संघटक समीर सोनावणे यांनी खूप परिश्रम घेतले.
धावफलक…
संभाजीनगर – १५ षटकांत ५ बाद ११७ धावा – राहूल तोरबे २०, समीर सोनवणे १६, अतुल भालेकर २ बळी). कोल्हापूर १४. ४ षटकांत ११८ धावा – मौक्तिक पाटील ३९, अतुल भालेकर २७).