भोर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावेळी विरोधक एकमेकांच्या विरोधात लढत असतात. तर काही दिवसापूर्वी भाजपने बारामती मशीनच्या माध्यमातून कार्यकर्त्यांबरोबर बैठकीतून तुमच्या मतदार संघातील प्रश्न खासदार, आमदार यांच्याकडून सोडवले जातात का, असे विचारतात. परंतु तेच भाजपचे कार्यकर्ते भोर बाजार समितीच्या निवडणुकीत एक जागेसाठी थोपटे पॅटर्न विरोधात राष्ट्रवादी शिवसेनेशी आघाडी करून लढले. मात्र, त्याना पराभवास सामोरे जावे लागले ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. मात्र, येणाऱ्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस पॅटर्नच चालणार असल्याचा टोला आमदार संग्राम थोपटे यांनी विरोधकांना लागावला.
वरवडी बुद्रुक (ता. भोर) येथे संचालक राजाराम तुपे यांनी आयोजित केलेल्या भोर बाजार समिती व खरेदी विक्री संघाच्या नवनिर्वाचित सभापती, उपसभापती, सर्व संचालकांच्या सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राजगड ज्ञानपीठाच्या मानद सचिव स्वरूपा थोपटे, माजी जिल्हा परिषद सदस्य गीतांजली आंबवले, माजी सभापती बाळासाहेब थोपटे, लहूनाना शेलार, युवा नेते पृथ्वीराज थोपटे, माजी पंचायत समिती सदस्य सतीश चव्हाण, राजगड संचालक उत्तम थोपटे,
जनसेवक अनिल सावले, सभापती आनंदा आंबवले, उपसभापती ज्ञानेश्वर पांगारे, संचालक राजाराम तुपे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अतुल किंद्रे, माजी सभापती अंकुश खंडाळे, संपत दरेकर, राजेंद्र शेटे, संतोष केळकर, दिलीप वरे, मधुकर कानडे, प्रकाश म्हस्के, बापू बांदल, गोरख मानकर, राजू शिंदे, विकास शिंदे, आनंद म्हस्के, पै. शिवाजी खोपडे, विकास शिंदे, विजय तुपे, रवीनाना तुपे, शंकर तुपे , अनंता तुपे, लक्ष्मण तुपे, सुनील गायवाड, विजय भेलके उपस्थित होते.
थोपटे म्हणाले की, विरोधाला विरोध म्हणून थोपटे आणि थोपटे नावाच्या व कॉंग्रेस पक्षाच्या विरोधात एकवटून विरोधक प्रत्येक निवडणुकीला एकत्र येतात. हा चुकीचा प्रकार सध्या मतदारसंघात सुरू आहे. सध्या झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी विरोधकांना धूळ चारीत चोख उत्तर दिलेले आहे.