राजगुरूनगर परिषदेची भूमिका : पथारीधारकांची घेतली बैठक
राजगुरूनगर – शहरातील वाडा रस्त्यावरील, पुणे नाशिक महामार्गावरील आणि पाबळ रोडवरील अतिक्रमणे हटवण्यात आल्यामुळे आम्हाला दिवाळी सणामुळे पुन्हा व्यवसाय करण्याची परवानगी देण्याची मागणी पथारी व्यवसायकांनी नगरपरिषदेत झालेल्या बैठकीत केली.
राजगुरूनगर नगरपरिषदेने ठाम विरोध करत ज्या जागा नगरपरिषद मालकीच्या आहेत तेथे व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात येईल. वाडा रोड आणि पुणे-नाशिक महामार्गाच्या कडेला जागा देण्याचे अधिकार नगरपरिषदेला नाहीत, अशी भूमिका मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी माडंली.
शहरातील वाडा रस्ता आणि पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग व पाबळ रस्त्यावरील अतिक्रमणे मागील महिन्यात हटविण्यात आली होती. ऐन सणासुदीच्या दिवसात पथारी, हातगाड्यांवर व्यवसाय करून उपजीविका करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. हातगाड्या बंद असल्याने पथारी धारकांनी नगर परिषदेकडे गाड्या लावण्याची, व्यवसाय पुन्हा सुरु करण्याचीमागणी केली. 1
5 दिवस होऊनही नगरपरिषदेने या विविध प्रकारचे हात व्यवसायिकांच्या पुर्नवसनासाठी कोणतेच पाऊल उचलले नाही त्यामुळे या व्यावसायिकाचे ऐन दिवाळीच्या सणात आर्थिक नुकसान झाले आहे होत आहे. पथारी हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांनी नागरपपरिषदेकडे जागेची मागणी करून व्यवसाय करण्यासाठी परवानगी मागितली होती.
जागा न दिल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता, त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी पथारी हातगाड्या धारकांची बैठक बोलावली होती. यावेळी कर सहायक श्वेता बाराथे, माजी नगराध्यक्ष बापू थिगळे, नगरसेवक मनोहर सांडभोर यांच्यासह शहरातील पथारी हातगाड्याधारक उपस्थित होते.
नगरपरिषदेमार्फत शहरातील सर्व पथविक्रेत्यांचे मोबाईल ऍप व सॉप्टवेअरद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून त्यांची नोंद केली जाणार आहे. याबाबत आवश्यक असणारी कागदपत्रे नगरपरिषदेकडे जमा करावीत पथ विक्रेत्यांनी नगरपरिषेदेला सहकार्य करावे. नगरपरिषदेने सुचवलेल्या जागेत व्यवसाय करावेत.
– निवेदिता घार्गे, मुख्याधिकारी
या जागा नगरपरिषदेने सुचवल्या
हॉंकर्स झोनसाठी जुना मोटार स्टॅंड, आणि गढई मैदानात जागा देण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. फळविक्रेत्यांना गढई मैदान, खाद्य पदार्थ विक्रेत्यांना जुना मोटार स्टॅंड व भाजीपाला अन्य विक्रेत्यांना खालच्या बाजारात व्यवसाय करावेत शहरातील वाहतूक समस्या होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी.
नगरपरिषदेच्या जागेला विरोध
या बैठकीत आम्हाला आहे त्याच ठिकाणी व्यवसाय करण्याची परवानगी देण्याची मागणी पथारीधारकांनी लावुन धरली.आहे त्या ठिकाणी व्यवसाय चालणार असून ग्राहकही त्याच ठिकाणी मिळतात त्यामुळे इतरत्र न हटवता आहे त्याच ठिकाणी वाहतुकीला अडचण होणार नाही याची काळजी घेत आम्ही यापुढे व्यवाय करू. दुसरीकडे व्यवसाय होणार नाहीत त्यामुळे हातविक्रेत्यांनी नगरपरीषदेने सुचित केलेल्या जागेला विरोध केला.