माऊली मंदिरात कार्तिकी एकादशी दिनी पुष्प सजावट
इंद्रायणी महाआरती उत्साहात
आळंदी – पंढरपूर येथील कार्तिकी एकादशी निमित्त आळंदीतही भाविकांनी एकादशी निमित्त परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रमांतून मंदिरात एकादशी भक्तिमय उत्साहात साजरी करण्यास गर्दी केली होती.
तीर्थक्षेत्र आळंदीत नेहमी हजारो भाविकांची श्रींचे दर्शनास होणारी गर्दी यावेळी वाढलेली पाहण्यास मिळाली. मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती. श्रींचे वैभवी थेट दर्शन व्यवस्था आळंदी संस्थानने केली होती.
एकादशी दिनी हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेत श्रींचे पालखीची नगरप्रदक्षिणा हरिनाम गजरात पूर्ण केली. यावेळी परंपरेने श्रींचे मानकरी, भाविक उपस्थित होते.
मानकरी याना नारळ प्रसाद वाटप करण्यात आले.इंद्रायणी नदीवर स्नान करण्यास भाविकांची दिवसभर गर्दी करून स्थान माहात्म्य जोपासले. अनेक भाविकांनी संध्याकाळी दीपदान केले.