कुसुम मांढरे : शिक्रापूर येथे बसथांब्याचे काम सुरू
शिक्रापूर – ग्रामीण भागातून नागरिक पुणे येथे प्रवास करत असताना बस थांबा नसल्याने प्रवाशांना उन्हात उभे रहाण्याची वेळ येत असते मात्र आता शिक्रापूर येथील तळेगाव रोड परिसरात नव्याने बस थांबा उभारला जात असल्याने नागरिकांची सोय होणार असल्याचे मत जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या कुसुम मांढरे यांनी व्यक्त केले.
शिक्रापूर येथे बस थांबा नसल्याने नागरिकांसह ज्येष्ठ नागरिकांना उन्हात उभे राहण्याची वेळ येत असल्याने डॉ. मराठे कॉलनीचे अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब शिंदे, सेवानिवृत्त पशूवैद्यकिय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी शिक्रापूर येथे बस थांबा उभारण्याची मागणी पीएमपीएमएल विभागाकडे केलेली असताना नुकतेच शिक्रापूर येथे बस थांबा उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे.
या कामाचे उद्घाटन मांढरे यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी पीएमपीएमएलचे व्यवस्थापक योगेश होले व निरंजन तुळपुळे, शिक्रापूरचे माजी सरपंच आबासाहेब करंजे, बाळासाहेब चव्हाण, डॉ. मराठे कॉलनीचे अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब शिंदे, सेवानिवृत्त पशूवैद्यकिय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके, माजी ग्रामपंचायत सदस्य शीला करंजे, संतोष भुजबळ यांसह सह्याद्रीचे शंभुराजे प्रतिष्ठानचे पदाधिकारी व आदी पदाधिकारी उपस्थित होते.