माळशिरस येथे विकासकामांचे भूमिपूजन
पॉईंटर : नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकार्यांचा सत्कार
भुलेश्वर – अटल बिहारी वाजपेयी, लाल कृष्ण आडवाणी, सुषमा स्वराज असे सुसंस्कृत नेते असताना भाजपा म्हणजे भारतीय जनता पार्टी होती. आता भ्रष्ट जनता पार्टी झाली असल्याची टीक खाखासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संजय जगताप यांच्या हस्ते माळशिरस येथे 7 कोटी 47 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच नवनिर्वाचित सरपंच आरती ज्ञानेश्वर यादव आणि सर्व सदस्यांचा नागरी सत्कार पार पड्ला, त्यावेळी खासदार सुळे बोलत होत्या. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रवक्ते विजय कोलते, मातंग नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष म्हस्कू शेंडगे, जेष्ठ साहित्यिक दशरथ यादव, बाळासाहेब यादव, गणेश ढोले, लक्ष्मण महाराज यादव यांनी मनोगत व्यक्त केली.
युवक काँग्रेसचे माऊली यादव यांनी प्रास्ताविकातून गेल्या चार वर्षांतील विकासकामांचा आढावा घेतला. याप्रसंगी सुदामराव इंगळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, महिलाध्यक्षा सुनिता कोलते, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, महिलाध्यक्षा अॅड. गौरी कुंजीर, महाविकास आघाडीचे समन्वयक नंदकुमार जगताप, गणेश जगताप, एकनाथ यादव, युवक काँग्रेसचे प्रभारी चेतन महाजन, नीरा बाजार समितीचे संचालक देविदास कामथे, संदिप फडतरे, शाहजान शेख, मनिषा नाझीरकर, महेश राणे, तुषार माहूरकर आदी उपस्थित होते. जयेश गद्रे यांनी सूत्रसंचलन तर रफिक शेख यांनी आभार मानले.
सरकार शिक्षण, शिक्षक विरोधी
फुले दांपत्याने मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली., राज्य शासन व केंद्र शासनाच्या वतीने महात्मा फुले यांच्या खानवडी या मुळगावी मुलींसाठी होत असलेल्या ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूलच्या पुर्णत्वासाठी राज्य शासन निधी देत नाही. हे सरकार शिक्षण आणि शिक्षकांच्या विरोधी असून राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी जाहिरपणे एका महिला शिक्षिकेचा अपमान केला असून याबद्दल त्यांनी शिक्षकांची माफी मागावी तसेच खानवडी येथील शाळेसाठी निधी द्यवा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.