जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा केल्याने आमदार भरणेंचे मानले आभार
इंदापूर – इंदापूर तालुक्यातील कळंब गावकर्यांनी राज्यांचे माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्यामुळे खंडकरी शेतकरी बांधवांच्या वर्ग नं.2 चे वर्ग नं.1 मध्ये रूपांतर करण्यात आले.तसेच मुस्लीम बांधवांच्या दफनभूमीच्या जागेचा प्रश्न लगेच मार्गी लागल्याने फटाके वाजवून लाडू भरवत आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जाहीर आभार मानले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते राजेंद्र पाटील म्हणाले की, इंदापूरच्या जनतेच्या प्रश्नासाठी आमदार दत्तात्रय भरणे शासनाच्या स्तरावर आवाज उठवतात. पाठपुरावा करतात त्यामुळे अनेक वर्षांपासून रेंगाळलेली कामे मार्गी लागतात.
आमच्या परिसरात खंडकरी शेतकर्यांना कायम आनंद देणारा निर्णय आमदार भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारकडून करुन घेतला. त्यामुळे नव्या पिढीची चिंता मिटली असल्याचे नमूद केले.आमदार भरणे यांचे श्रेय कोणाला ही घेता येणार नाही. जनतेसाठी काम करणारे नेतृत्व फक्त आमदार दत्तात्रय भरणे एकमेव आहेत, अशीही माहिती पाटील यांनी दिली .यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.