पंचांच्या अति सूक्ष्म निरीक्षणातून निवड
खडकवासला – नऱ्हे येथील नवले लॉन्स मध्ये झालेल्या पुणे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत अनिकेत राजगुरू याने सिंहगड श्री किताब पटकावला.
पुणे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा सिंहगड श्री बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन पुणे व बॉडी बिल्डींग फिजिक्स स्पोर्ट्स या संघटनेच्यावतीने घेण्यात आल्या. अजय गोळे, मिलिंद पानसरे, राजेंद्र कांबळे यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते. महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असोसिएशनचे अॅड. विक्रम रोठे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर,
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विकास दांगट, सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर, महापालिका सहाय्यक आयुक्त प्रदीप आव्हाड, वर्ल्ड चॅम्पियन महेंद्र चव्हाण, वाइल्ड क्राफ्ट मॉडेल स्नेहा प्रकाश, आंतरराष्ट्रीय नृत्यांगणा लौकिक पानसरे, विशाल शाह, सिद्धू कांबळे, विष्णु कदम, नितिन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात सिंहगड श्री २०२३ या स्पर्धेसाठी अतिशय चुरशीची लढत बॉडीबिल्डर अनिकेत राजगुरू, राजेश काळे व फिरोज शेख यांच्यात झाली. पंचांच्या अति सूक्ष्म निरीक्षणाने सिंहगड श्री २०२३ या किताबाचा मानकरी अनिकेत राजगुरू ठरला. सूत्रसंचालन किरण जाधव, स्टेज मार्शल युनुस काझी यांनी केले.
चमकदार कामगिरी करणारे विजेते
सिंहगड श्री २०२३ स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे : ५० किलो वजनी गट- प्रथम क्रमांक- अजय ओझरकर, दुसरा क्रमांक दीपक कांबळे, तिसरा क्रमांक अविनाश नायडू, ६० किलो वजनी गट- संदीप तिवडे, राजेश क्षीरसागर, सिद्धेश गडगे, ६५ किलो वजनी गट
निलेश धोंडे, अक्षय वाडीकर, अनिकेत अनारसे, ७० किलो वजनी गट- राजेश काळे, ओमकार भांदिगरे, सोनू कांबळे, ७५ किलो वजनी गट- ऋषिकेश बिरेदार, शिवम वडार, अमर पडवळ, ८० किलो वजनी गट- अनिकेत राजगुरू, विनोद कागडे, विश्वनाथ ढोणे,
८० किलो वरील वजनी गट- फिरोज शेख, भरत चव्हाण, प्रणव सुधेनाड, मेन्स फिजीक्स स्पर्धेतील पहिला गट- अथर्व थोपटे, अजित तावरे, वाझीद शेख, मेंस फिजीक्स स्पर्धेतील दुसरा गट- प्रथमेश कांबळे, अथर्व कटारे, अमर पडवळ.