पक्ष संघटना बळकट करा – जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील
आळंदी – आळंदीत भाजपा पक्ष संघटन कसे मजबूत होईल, पक्ष कसा वाढेल यासाठी प्रभावी सुसंवाद साधणार आहे. कार्यकर्त्यांना जो पर्यंत संधी मिळत नाही तोपर्यंत पक्ष मोठा होणार नाही.
आळंदीतील प्रमुख कार्यकर्त्यांचे माध्यमातून पंचक्रोशीत काम करून विश्वास निर्माण करा. भाजपचे माध्यमातून “घर चलो’ अभियान राबविण्यात येणार आहे. “मेरी मिट्टी, मेरा देश’ उपक्रम सर्वत्र प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी केले.
शरद बुट्टे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे यांनी नूतन पदग्रहण व नियुक्तीपत्र वाटप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बुट्टे पाटील बोलत होते. यावेळी संजय घुंडरे पाटील, संदीप सातव, पांडुरंग वहीले, बंडूमामा पालवे सुरेश झोंबाडे, सचिन गिलबिले, सचिन काळे, गणेश गरुड, भागवत आवटे, रूपेश वाळके, संतोष गावडे, शंतनू पोफळे, ऋषिकेश पासलकर, सचिन सोळंकर, आकाश जोशी यांच्यासह विविध सेलचे अध्यक्ष, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.