पुणे महसूल विभागीय संघटकपदी सुधीर गिरमे यांची निवड
थेऊर – महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या उपाध्यक्षपदी पुणे जिल्ह्यातील बजरंग मेकाले व पुणे महसूल विभागीय संघटकपदी सुधीर गिरमे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पुणे येथील अल्पबचत भवनमध्ये ज्ञानदेव डुबल यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी करण्यात आल्या.
महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेची पुढील 5 वर्षांसाठी नुतन पदाधिकारी कार्यकारणीची निवड करण्यात आली. नवनियुक्त अध्यक्ष म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील अनिल शिवाजीराव सूर्यवंशी यांची तर कार्याध्यक्षपदी नाशिक जिल्ह्यातील निलकंठ उगले व सांगली जिल्ह्यातील गौस महमंद लांडगे यांची तर उपध्याक्षपदी पुणे जिल्ह्यातील बंजरग मेकाले मंडलाधिकारी वडगाव मावळ (जि. पुणे) यांची तर ठाणे जिल्ह्यातील संतोष आगिवले याची सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड झाली.
पुणे महसूल विभागीय संघटकपदी सुधीर गिरमे (तलाठी सासवड ता. पुरंदर) यांची बिनविरोध निवड झाली. तसेच इतर पदाधिकारी कार्यकारणी देखील बिनविरोध निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेत तलाठी व तलाठी संवर्गातील पदोन्नती मिळालेले मंडाळाधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार यांचा सभासद म्हणून समावेश आहे.
सभेचे नियोजन पुणे जिल्हा तलाठी संघटनेचे अध्यक्ष सुधीर तेलंग, सरचिटणीस सुधीर गिरमे, कार्याध्यक्ष हेमंत भागवत, हेमंत नाईकवाडी, सल्लागार सचिन चव्हाण यांनी केले. यावेळी पुणे जिल्हा तलाठी संघटना व तालुका तलाठी संघटना पदाधिकारी उपस्थित होते.