शिरूर ग्रामीणमध्ये विविध उपक्रम : सामाजिक क्षेत्रात योगदान
सविंदणे – शिरूर ग्रामीण माजी सरपंच विठठलराव घावटे यांचा वाढदिवस समाजपयोगी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खासदार सुजय विखे, प्रदीप कंद, राहुल पाचर्णे, अरूणाताई घोडे, गणेश जामदार, राहुल शिंदे, आबा सरोदे, शशिकांत सरोदे, निलेश गाडेकर, दिनकर साबळे यांच्यासह अन्य गावचे सरपंच, उपसरपंच व बडया राजकीय दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली होती. आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने ते प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला राजकीय वलय प्राप्त झाले होते.
प्रत्येक वर्षी घावटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. यावर्षी त्यात खंड पडला नाही. घावटे हे पंचक्रोशीत लोकप्रिय आणि लोकमिमुख नेतृत्व आहे. ते कायमच समाजासाठी आपला अमूल्य वेळ देतात. अनेक कल्याणकारी योजना राबवितात. शिरूरच्या (ग्रामीण) विकासात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सर्व सामान्यांच्या सुख- दुःखात नेहमीच सहभागी असणारे नेतृत्व आपला छोटा मोठा व्यवसाय सांभाळीत समाजासाठी वेळ देतात. अनेक गरिब आणि गरजूंच्या अडी अडचणीला ते नेहमीच धावून जातात.
यावेळी काही तरुणांनी हृदय तपासणी, डोळे तपासणी, तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. रक्तदानातून अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचले जाणार आहेत. भव्य क्रिकेटच्या सामन्यांचे आयोजन करून मा. विठठलशेठ घावटे युवा मंचाने खेळ संस्कृतीला चालना देत युवकांचे मोठे संघटन उभे केले आहे. याच शक्तीचा उपयोग समाजातील अनेक सामाजिक उपक्रमासाठी केला जातो.
झेडपीसाठी उमेदवारी जाहीर
आबा सोनवणे यांनी विठ्ठल घावटे यांची जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली. वाढदिवसाच्यानिमित्त इच्छुक उमेदवारांच्या भुवया उंचावल्या. कार्यकर्ते मात्र सोनवणे यांच्या भूमिकेचे जोरदार स्वागत करताना दिसत होते. दहा वर्षांपासून विविध उपक्रम राबवत सामाजिक, धार्मिक, कार्यात सहभाग घेत आहेत.