आमदार दत्तात्रय भरणे : नागपूरच्या अधिवेशनात मांडली आग्रही भूमिका
इंदापूर – राज्यात सध्या अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांचे असंख्य प्रश्न प्रलंबित असून यांचे सर्वच प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधिमंडळात,औचित्याच्या मुद्द्याद्वारे प्रश्न उपस्थित करून त्यांना न्याय देण्यासाठी शासनाचे लक्ष आमदार दत्तात्रय भरणे यांनी आक्रमकपणे वेधले.
इंदापूर तालुका, पुणे जिल्ह्यासह राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी संघटनेने आमदार दत्तात्रय भरणे यांची यासंदर्भात भेट घेऊन समस्या मांडण्याची विनंती केली होती. यावर आमदार भरणे यांनी आपण विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित करून आपले म्हणणे शासनापर्यंत पोहोचवतो अशी ग्वाही दिली होती.
यावर मंगळवारी (दि. 19) आमदार भरणे यांनी अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा सेविका यांच्या संदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित करून त्यांच्या मागण्या मान्य करणे गरजेचे आहे.असे सांगत विविध मुद्द्यांचे सविस्तर विश्लेषण करून यावर शासनाचे लक्ष वेधून घेतले.
यात प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करणे हक्काच्या वेतनासह शासकीय कर्मचार्यांचा दर्जा द्यावा तसेच वेतन व महागाई भत्तेही द्यावेत इतर शासकीय सोयी सुविधा द्याव्यात. या संदर्भात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या प्रसंगी औचत्याचा मुद्दा उपस्थित केला व शासनाचे लक्ष वेधून घेतले.