शाळेमध्ये मुलांच्या उपक्रमाला महिला पालकांचा सहभाग
शिक्रापूर : केंदूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पर्हाडवाडी येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत मुलांचे आर्थिक साक्षरता व व्यवहार ज्ञान कौशल्य वाढण्यासाठी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांनी
आनंद बाजाराचे करण्यात आले असताना शाळेत महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला असताना महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचे मुख्याध्यापिका वैशाली थिटे व शिक्षीका मनिषा साकोरे यांनी सांगीतले.
केंदूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पर्हाडवाडी येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत शाळेत बालसंसद निवडणूक, शालेय बचत बँक, आर्थिक साक्षरते अंतर्गत कॅनरा बँकेस भेट, प्लॉस्टिक मुक्त शाळा, नवभारत साक्षरता, मेरी माटी मेरा देश, स्वच्छता मॉनिटर, कंपोस्ट खत निर्मिती, परसबाग,
राष्ट्रीय एकात्मता यांसारखे विविध उपक्रम शाळेत यशस्वीपणे राबविले जात असताना या उपक्रमांमधून मुलांना व्यवहार कौशल्य विकसित होण्यास मदत झाली तसेच नाणी व नोटा याविषयीचे ज्ञान मिळाले आहे, मुलाच्या या आनंदी बाजारात भाजीबाजार, खाऊगल्ली तसेच विविध वस्तूंविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती मिळाली असताना या उपक्रमासाठी अनेक पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.