राजगुरूनगर – खेड तालुक्यात 9 ते 12वी पर्यंतच्या 104 पैकी 54 शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांची उपस्थिती समाधानकारक आहे; मात्र तालुक्यातील अजूनही 50 टक्के शाळा सुरु झाल्या नाहीत. शिक्षक शाळांमध्ये उपस्थित राहून ऑनलाइन शिक्षण प्रक्रिया राबवत आहेत, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.
खेड तालुक्यात आज अखेर 54 शाळांमध्ये 2460 विद्यार्थ्यांनी उपस्थिती दाखवल्याने पुन्हा एकदा शाळा गजबजू लागल्या आहेत. तालुक्यात भीमाशंकर विद्यालय आव्हाट, त्रिमूर्ती विद्यालय तिन्हेवाडी, भैरवनाथ विद्यालय दोंदे, आर्या इंग्लिश मीडियम चांडोली, श्रीपती बाबा महाराज विद्यालय महाळुंगे, न्यू इंग्लिश कोहिंडे बुद्रुक, सुभाष विद्यालय बहुळ, शिवाजी विद्यालय शेलपिंपळगाव, महाराज फत्तेसिंह गायकवाड विद्यालय दावडी, हनुमान विद्यालय चिंचोशी, अंबिका विद्यालय कनेरसर, जवाहर विद्यालय चास, माध्यमिक विद्यालय काळेची वाडी, रामभाऊ म्हाळगी विद्यालय कडूस, नवीन माध्यमिक विद्यालय मरकळ, संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालय सोळू, शिवाजी विद्यालय डेहणे, ज्युनिअर महाविद्यालय डेहणे, महात्मा गांधी विद्यालय राजगुरुनगर, कै. गणपतराव टाकळकर विद्यालय टाकळकरवाडी, हुतात्मा राजगुरु महाविद्यालय राजगुरुनगर, के. टी. ई. एस. राजगुरुनगर,
एस. एन. इंग्लिश मेडीयम, सुमंत विद्यालय पिपंरी, साने गुरुजी विद्यालय खरपुडी, नुतन विद्यालय रेटवडी, साने गुरुजी विद्यालय खरपुडी, चौधरी पाटील विद्यालय, नूतन विद्यालय रेटवडी, आदर्श विद्यालय शिरोली, माध्यमिक विद्यालय निमगाव, मामासाहेब मोहोळ विद्यालय पाळु, महाराज यशंवत राव होळकर विद्यालय वाफगाव, माध्यमिक विद्यालय गुळाणी, आदर्श विद्यालय आंबोली, मळुदेवी विद्यालय वाळद, कर्मवीर विद्यालय वाडा, रेणुका विद्यालय रासे, भानोबा विद्यालय कोयाळी, मॉंर्डन विद्यालय भोसे, होली इंग्लिश स्कुल भोसे, शरदचंद्र माध्यमिक विद्यालय वडगाव घेनंद, शिंगेश्वर विद्यालय कुडे बुद्रुक, राऊत विद्यालय घोटवडी, शिवाजी विद्यालय चाकण, भैरवनाथ विद्यालय कुरुळी, स्वामी समर्थ इंग्लिश मेडीयम, समर्थनाथ माध्यमिक विद्यालय चिंबळी फाटा, आनंद इंग्लिश मेडीयम, इंदिराजी विद्यालय मोई, कुंडेश्वर विद्यालय पाईट, डायनॅंमिक इंग्लिश मीडियम, भामचंद्र विद्यालय भांबोली, राजे शिवछत्रपती विद्यालय कंरजविहिरे आदी शाळा सुरु झाल्या आहेत.
फी मागणाऱ्या शाळांना सज्जड इशारा
खेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागातंर्गत 35 केंद्रांतर्गत 23 केंद्रातील 54 शाळा सुरु झाल्या आहेत. इंग्रजी माध्यमिक शाळा सुरु होत आहेत. काही शाळांमध्ये मुलांच्या ऑनलाइन शिक्षणाला ब्रेक लावून फीसाठी शाळा व संस्थेकडून तगादा लावल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्यामुळे गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी शाळा व्यवस्थापनाला नोटीस काढून कारवाई करण्याचा सज्जड इशारा दिला आहे. लॉकडाऊनमुळे अजूनही काही पालक सावरले नाहीत तोच शाळा, संस्थाचालक फी वसुलीसाठी पालकांकडे मागणी करीत असल्याने मुलांच्या शिक्षणापेक्षा शाळा फी कशी भरायची, याची भ्रांत पडली आहे.