हिंदूंवर अन्याय शिवसेना सहन करणार नाही : सातपुते

नगर – हिंदूंवर अन्याय, अत्याचार शिवसेना सहन करणार नाही, असे प्रतिपादन शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी केले. शहरातील तपोवन रोड भागातील सूर्यनगर येथील नागरिकांना काही समाजकंटकांनी पूजा, आरती करण्यास विरोध करून महिलांना मारहाण केली. याची दखल घेत शिवसेनेने येथील श्री गणेश मंदिरात चतुर्थीनिमित्त महाआरती केली, यावेळी सातपुते बोलत होते. यावेळी संभाजी कदम, भगवान फुलसौंदर, नगरसेवक योगीराज गाडे, संतोष गेनआप्पा, सचिन शिंदे, अमोल येवले, दत्ता कावरे, मदन आढाव आदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सातपुते म्हणाले, शहरामध्ये कोणीही जातीजातीमध्ये तेढ निर्माण करून शहराचे मंगलमय वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करू नये. सर्वांना आपल्या धर्माचा अभिमान असतो. महिलांना मारहाण करणे हे लाजिरवाणे कृत्य आहे. याप्रसंगी योगीराज गाडे म्हणाले, कोणावरही अत्याचार, अन्याय झाला तर शिवसेना अत्याचारग्रस्तांच्या पाठिमागे नेहमी खंबीरपणे उभी असते. सामान्य नागरिकांवर होणारा अन्याय कदापी सहन केला जाणार नाही, असेही गाडे यावेळी म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.