शिरूर -शिरूर तालुक्यातील 13 गावात 19 करोना बाधित रुग्ण आढळले, तर एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांनी दिली. शिरूर शहरात सैनिक सोसायटी येथील करोना पॉझिटिव्ह आढळली आहे. तालुक्यात बाधित यांचा एकूण आकडा 4971 एवढा झाला असून 4635 करोना बाधित यांनी मात केली आहे.
तर 142 जणांचा मृत्यू झाला आहे. 202 जण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. शिरूर ग्रामीण रुग्णालय येथे आज 16 जणांची करोना रॅपिड टेस्ट करण्यात आली होती. त्यापैकी 1 जण करोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. आजपर्यंत 142 जणांचा मृत्यू झाला असून, त्यात ग्रामीण भागातील 124 तर शहरातील 18 जणांचा समावेश आहे.
कारेगावात 3, शिरूर, न्हावरे, मांडवगण प्रत्येकी 2, तर तळेगाव ढमढेरे, सादलगाव, शिरूर शहर 2, सणसवाडी 2, कोरेगाव भीमा, रांजणगाव गणपती, आंधळगाव, सरदवाडी, मलठण, कर्डिलेवाडी येथे प्रत्येकी 1, असे तालुक्यात 13 गावात 19 बाधित रुग्ण आढळले.