पुणे- गेल्या 24 तासात करोनाचे 188 बाधित आढळले असून, बाधितांची संख्या आता आटोक्यात येत आहे. पण, सक्रीय बाधितांमध्ये 20.02 टक्के नागरिकांना रुग्णालयात दाखल करावे लागले असून, अशा बाधितांची संख्या तुलनेने जास्त आहे.
सक्रीय बाधितांची संख्या कमी झाली असून, ती 1 हजार 773 आहे. यातील 13 जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. याशिवाय 106 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. गेल्या 24 तासांतील मृतांची संख्या चार असून, त्यातील दोन शहर हद्दीतील आहेत. गेल्या 24 तासांत 360 जणांना डिस्चार्ज दिला आहे.
आजपर्यंत 44 लाख 72 हजार 692 संशयितांच्या स्वॅब टेस्ट करण्यात आल्या. त्यातील 6 लाख 59 हजार 653 जण बाधित आढळले आहेत. त्यातील 6 लाख 48 हजार 540 बाधित बरे झाले आहेत. मात्र बाधितांमधील गेल्या अडीच वर्षांत 9 हजार 340 जणांना जीव गमवावा लागला आहे.