IPL 2024 (MI vs SRH Match 55) : आयपीएल 2024 चा 55 वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या मोसमातील 12वा सामना खेळण्यासाठी मुंबई इंडियन्स मैदानात उतरली होती. आपल्या 12व्या सामन्यात मुंबईने हैदराबादचा सहज पराभव करत चौथा विजय मिळवला.
या सामन्यात सूर्यकुमार यादवने शानदार फलंदाजी करत मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला. यासह त्याने आयपीएलच्या इतिहासात रोहित शर्माची बरोबरी केली. वास्तविक, मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत सूर्यकुमार यादवने रोहित शर्माची बरोबरी केली आहे.
मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक आयपीएल शतके…
रोहित शर्मा : 206* डाव, 2 शतक, 109* सर्वोच्च धावसंख्या
सूर्यकुमार यादव : 92*डाव, 2 शतक, 103* सर्वोच्च धावसंख्या
सनथ जयसूर्या : 30 डाव, 1 शतक, 114* सर्वोच्च धावसंख्या
सचिन तेंडुलकर : 78 डाव, 1 शतक, 100* सर्वोच्च धावसंख्या
लेंडल सिमन्स : 29 डाव, 1 शतक, 100* सर्वोच्च धावसंख्या
कॅमेरॉन ग्रीन : 16 डाव, 1 शतक, 100* सर्वोच्च धावसंख्या
IPL 2024 (MI vs SRH Match 55) : सूर्याचं नाबाद शतक, मुंबईचा हैदराबादवर 7 विकेट्सने विजय…
सूर्यकुमार यादव विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
आयपीएल 2024 च्या 55 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चौथा विजय मिळवला. या सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. मात्र हैदराबादचे गोलंदाज सूर्यकुमार यादवला शतक झळकावण्यापासून रोखू शकले नाहीत. सूर्यकुमार यादवने 200 च्या स्ट्राईक रेटने 51 चेंडूत नाबाद 102 धावा केल्या, ज्यात 12 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. सूर्यकुमार यादवने षटकार ठोकत आपले शतक झळकावले आणि मुंबई इंडियन्सला विजयाकडे नेले.