पुणे –शहरात बुधवारी 1,805 नवे करोनाबाधित आढळले. अवघ्या एका दिवसात बाधितांची संख्या 700 ने वाढल्याने चिंतेत भर पडली आहे. याशिवाय संशयितांची संख्याही वाढली आहे.
करोना बाधितांची संख्या गेल्या तीन दिवसांपासून वेगाने वाढत असून, मंगळवारी सुमारे 500 तर बुधवारी थेट सातशेने ही संख्या वाढली आहे. परंतु सुदैवाची गोष्ट म्हणजे एकाही बाधिताच्या मृत्यूची नोंद शहर आणि हद्दीबाहेर नाही. दिवसभरात 131 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. दिवसभरात 13 हजार 443 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे.
सक्रिय बाधित पाच हजारांवर
एका दिवसात सक्रिय बाधितांची संख्या वेगाने वाढली असून, ती 5 हजार 464 झाली आहे. त्यामुळे देखील अधिक चिंतेचे वातावरण शहरात निर्माण झाले आहे. यातील 73 जणांची प्रकृती गंभीर असून, 109 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.