हडपसर- “व्ययक्तिक पदप्रतिष्ठेपेक्षा काँग्रेस पक्षाची पत जनमाणसांत वाढवण्यासाठी, काँग्रेसने आजवर केलेली कामे लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलर पाहिजे, खरे तर काँग्रेस हीच आपली ओळख आहे.
काँग्रेसचा इतिहास त्यागाचा व बलिदानाचा आहे. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचा त्याग, कठिण परीस्थितीतही त्यानीं जो काँग्रेसचा वारसा जोपासलाय, संघर्ष करतायेत त्याचें हात बळकठ करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यानी केले .
श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त हडपसर, वानवडी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा अभिजित शिवरकर याच्यां जनसंपर्क कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शिवरकर बोलत होते.यावेळी विजय जाधव, माजी नगरसेविका कविता शिवरकर, सुल्तान खान, आमिन शेख, आनंद दुबे, सुदाम जांभुळकर, दिनेश गिरमे, शंभुशेठ जांभुळकर, माया डुरे, इदिंरा तुपे,नितीन आरू, दिलिप तुपे, अँड विजय राऊत, वैभव डांगमाळी, हसन कुरेशी, अल्ताफ शेख, अकबर शेख, अजित ससाणे, सुभाष सरोदे, गणेश कवडे,सुभाष बोराटे, अस्लम बागवान, उदय लोणकर, बाळासाहेब टिळेकर, राजु शिवतारे,अजय खामकर याच्यांसह प्रमुख काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान भारतीय सैन्यदल प्रमुख जनरल बिपीन रावत व त्याच्याबरोबर अपघातात मृत्यु झालेल्या सर्व लष्करी अधिकारी यानां श्रद्धाजंली वाहण्यात आली. प्रास्ताविक माजी नगरसेवक, प्रदेश युवक सरचिटणिस अभिजित शिवरकर यानी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हडपसर विधानसभा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांतमामा तुपे होते. आभार युवक काँग्रेस अध्यक्ष अमित घुले यांनी मानले.