फुरसुंगी : भाजपा युवामोर्चा हवेली तालुकाध्यक्ष पदी फेरनियुक्तीचे पत्र स्विकारताना सचिन हांडे.
फुरसुंगी – भाजपची ध्येय-धोरणे, केंद्र व राज्य शासनाच्या योजना व उपक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणार आहे. हवेली तालुक्यात पक्षाची युवक संघटन शक्ती मोठी आहे, ती आणखी वाढविण्यावर भर देणार असून युवकांना व्यवसाय, रोजगार, उद्योग निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचे युवामोर्चा तालुकाध्यक्ष सचिन हांडे यांनी सांगितले.
मध्य हवेली तालुका भाजपा युवामोर्चा हवेली तालुकाध्यक्ष पदी हांडेवाडी (ता. हवेली) येथील सचिन हांडे यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, पश्मिम महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष जालिंदर कामठे, तालुकाध्यक्ष संदीप हरपळे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी हांडे बोलत होते.
यावेळी युवामोर्चा जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील, ज्येष्ठ नेते पंडीत मोडक, माजी आमदार अशोक टेकवडे, बाबाराजे जाधवराव, जिल्हा सरचिटणिस राहुल शेवाळे आदी उपस्थित होते.भाजपच्या वरिष्ठांनी अजापर्यंतच्या कामावर विश्वास ठेवत यापदी फेरनियुक्ती केल्याबद्दल सचिन हांडे यांनी आभार व्यक्त केले.