पुणे महापालिकेमध्ये 23 गावे समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेला गती
पुणे – पुणे महापालिकेमध्ये 23 गावे समाविष्ट करण्याच्या अधिसूचनेवर नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यानुसार याविषयी आतापर्यंत 47 हरकती विभागीय आयुक्त कार्यालयात आल्या आहेत.
येत्या दि.22 जानेवारीपर्यंत हरकती नोंदविता येणार आहे. त्यानंतर विभागीय आयुक्त या हरकतींवर सुनावणी घेणार असून त्याविषयीचा अहवाल राज्य शासनाला सादर करणार आहे.
ही गावे होणार समाविष्ट
म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रुक, किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नऱ्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी, वाघोली.