पुणे – अखिल मंडई मंडळाच्या शारदा गणेशाच्या अंगावरील दागिन्यांवर चोरांनी डल्ला मारला आहे. काल (गुरूवार) रात्री ही चोरी झाली. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.शारदा गणेशाच्या 22 ते 25 तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याची घटना घडली आहे. दरम्यान, पुणेकरांचे श्रद्धा स्थान असणाऱ्या गणेश मंदिरात चोरी झाल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.