पुलवामा हल्ल्यातील शहिदांना दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली – गेल्या वर्षी (१४ फेब्रुवारी) जम्मू-काश्मीरमधील पुलवामा सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी भ्याड हल्ला झाला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून प्रचंड संतापाची लाट उसळली होती.

दरम्यान, या दहशतवादी हल्ल्याला आज (१४ फेब्रुवारी) एक वर्ष पूर्ण झालं असून शहीद वीर जवानांना सर्वच स्तरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच, सीआरपीएफने सुद्धा सोशल मीडियावर ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

“पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली. त्यांनी आपले जीवन आपल्या देशाच्या सेवेसाठी आणि संरक्षणासाठी वाहिले. पुलवामा हल्ल्यातील जवानांचे बलिदान देश कधीच विसरणारही नाही” असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.