#प्रभात_व्हॉट्‌सअॅप_रिपोर्टर : समस्या तुमची, व्यासपीठ आमचे

पिंपरी-चिंचवड शहर वेगाने विस्तारत आहे. वाढते नागरीकरण, लोकसंख्या वाढ आणि तुलनेत कमी पडणाऱ्या सुविधा अशी परिस्थिती सध्या पाहण्यास मिळत आहे. नागरिकांना किमान मूलभूत नागरी सुविधा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, वीज आदी विषयांशी संबंधित छोटे-छोटे प्रश्‍न सुटावेत, अशीच सर्वसामान्यांची माफक अपेक्षा आहे. या समस्या मांडण्यासाठी आम्ही आपल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत. तर उचला मग लेखणी आणि मांडा तुमची समस्या. अचूक, थेट आणि नेमक्‍या शब्दांमध्ये. आपली बातमी आम्हाला छायाचित्रासह व्हॉट्‌सऍपवर पाठवा आणि “प्रभात’चे व्हॉट्‌सऍप रिपोर्टर बना.

चेंबरचे झाकण तुटल्याने धोका
पिंपरी – थेरगाव येथील गणेशनगर परिसरातील रत्नदीप कॉलनीतील चेंबरचे झाकण तुटले आहे. यामुळे येथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. येथे कायम वाहतूक सुरु असते व पायी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यामुळे येथील चेंबरचे झाकण बदलण्यात यावे व अपघाताची शक्‍यता टाळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
– सुभाष चव्हाण, थेरगाव, चिंचवड


डांगे चौकात वाहतुकीस अडथळा
पिंपरी – थेरगाव, डांगे चौकात सर्जा लॉज जवळील चेंबरचे झाकण तुटल्याने येथून जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे वाहतूक मंदावली असून येथील चेंबरची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.


रस्त्यावर खडी पसरली
पिंपरी – लक्ष्मणनगर येथील प्रेरणा शाळेजवळील रस्त्यावर खडी पसरली असल्याने येथून ये-जा करणाऱ्या वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत काही सोशल संघटना काम करीत आहे. मात्र, याबाबत महापालिका प्रशासन कधी लक्ष घालणार असा प्रश्‍न परिसरातील नागरिक करीत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here