औरंगाबाद – राज्यातील मॉल आणि सुपरमार्केटमध्ये वाइन विक्रीसाठी मुभा देण्याच्या महाविकास आघाडीच्या निर्णयाविरोधात एमआयएम पक्षाच्या वतीने औरंगाबाद शहरात आंदोलन करण्यात आले. शहरातील एका जरी दुकानात वाइन आली तर मी स्वतः हे दुकान आधी फोडणार, असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता.
हिंमत असेल तर वाइन दुकानात ठेवून दाखवा, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला होता. त्यानंतर एमआयएमने आज गुरुवारी शहरातील क्रांती चौकात सरकारच्या वाइन विक्री धोरणाविरोधात निदर्शने केली.
सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला परवानगी देणाऱ्या निर्णयाचा औरंगाबाद एमआयएम पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला. आज गुरुवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी क्रांती चौकात आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देत निदर्शने करण्यात आली. यावेळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी फलक हातात धरून सरकारनिरोधात घोषणा दिल्या.
आघाडी सरकारच्या सुपर मार्केटमध्ये विक्री निर्णयाचा एम आय एम औरंगाबाद च्या वतीने क्रांती चौकात आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देत निदर्शने करण्यात आली. यावेळी या आमच्या कार्यकर्त्यांनी फलक हातामध्ये धरून सरकारविरोधात घोषणाबाजी केली.