प्रो कबड्डी लीग स्पर्धा : पहिल्या विजयासाठी तेलुगु टायटन्स उत्सुक

यु पी योद्धापुढे बंगालचे आव्हान

आज होणारे सामने

यु पी योद्धा वि. बंगाल वॉरियर्स
रात्री : 7-30 वाजता

तेलुगु टायटन्स वि. दबंग दिल्ली
रात्री : 8-30 वाजता

हैदराबाद – घरच्या मैदानावर लागोपाठ दोन सामने गमाविल्यानंतर प्रो कबड्डी लीगमध्ये पहिला विजय मिळविण्यासाठी तेलुगु टायटन्स संघाला आज येथे दबंग दिल्लीविरूद्ध सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. या सामन्याआधी येथे यु पी योद्धा व बंगाल वॉरियर्स यांच्यात रंगतदार लढत होणार आहे.

गचीबावली स्टेडियमवर हे सामने सुरू आहेत. तेलुगु संघाला पहिल्या लढतीत यु मुंबाकडून 25-31 असा पराभव पत्करावा लागला होता. पाठोपाठ त्यांना तमिळ थलाईवाज संघाने त्यांना 39-26 असे पराभूत केले होते. या दोन्ही सामन्यांमध्ये तेलुगु संघाच्या खेळाडूंना अपेक्षेइतक्‍या चढाया करता आल्या नव्हत्या. तसेच त्यांच्या खेळाडूंनी बचावात्मक खेळातही निराशा केली होती. त्यांना दिल्लीविरूद्ध या दोन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. स्पर्धेतील महागडा खेळाडू सिद्धार्थ देसाई याला अद्यापही लक्षणीय कामगिरी करता आलेली नाही.

तेलुगु टायटन्स

बलस्थाने- अबोजर मोहाजीरमिघामी, अमितकुमार, सिद्धार्थ देसाई, रजनीशकुमार, विशाल भारद्वाज हे अष्टपैलू खेळाडू
कच्चे दुवे- सांघिक कौशल्य दाखविण्यात अपयश.
बचाव तंत्रात अनेक चुका. आक्रमक चढायांवर नियंत्रणाचा अभाव

दबंग दिल्ली

बलस्थाने- अनुभवी व युवा खेळाडूंचा समतोल.
सराव सत्रात तंदुरूस्तीवर अधिक भर
कच्चे दुवे- “स्टार” खेळाडूंचा अभाव
शेवटच्या क्षणी खेळावर नियंत्रणाचा अभाव

यु पी योद्धा

बलस्थाने- रिशांक देवडिगा, श्रीकांत जाधव, मोनू गोयाट आदी मातब्बर खेळाडूंमुळे भक्कम संघ
पल्लेदार चढायाबाबत अनुभवी खेळाडू
कच्चे दुवे– बचावात्मक खेळात चुका
शेवटच्या 5 मिनिटांमध्ये खेळावर नियंत्रण नाही

बंगाल वॉरियर्स

बलस्थाने- मोहम्मद नबीबक्ष, सुकेश हेगडे, जीवाकुमार, राकेश नरवाल आदी अनुभवी खेळाडूंमुळे बलवान संघ
कच्चे दुवे- सांघिक कौशल्याचा अभाव
खोलवर चढाया करताना होणाऱ्या चुका

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)