विधानसभा निवडणूकीसाठी कॉंग्रेस सोमवारपासून घेणार इच्छुकांच्या मुलाखती

मुुंबई – आगामी विधानसभा निवडणूकीसाठी आघाडी म्हणून लढणाऱ्या कॉंग्रेसने एकीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जागावाटपाची चर्चा सुरु केली असताना दुसरीकडे राज्यभरातील सर्व मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे वेळापत्रक जाहिर केले आहे. 29, 30 व 31 जुलै रोजी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

येत्या ऑक्‍टोबरमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीने निवडणुकीसाठी 288 मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले होते. त्याला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती त्यांच्या जिल्हा मुख्यालयात 29, 30, 31 जुलै रोजी होणार आहेत.
प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी उमेदवारांच्या मुलाखतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन निरीक्षकांची नेमणूक केली आहे. हे निरीक्षक मुलाखती घेऊन आपला अहवाल प्रदेश कॉंग्रेस कमिटीला देणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस ऍड. गणेश पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)