Bengaluru Bulls vs U Mumba, Pro Kabaddi League 2024 :सुशीलच्या सुपर-10 व्यतिरिक्त, सुरजित सिंग (6) आणि रणसिंग (5) च्या हाय-5 कामगिरीच्या जोरावर बेंगळुरू बुल्सने प्रो कबड्डी लीग 2023-24 च्या 10 व्या हंगामातील 104 व्या सामन्यात यू-मुंबाचाचा 42-37 असा पराभव केला. नवी दिल्लीतील त्यागराज इनडोअर स्टेडियमवर हा सामना झाला.
ಮುಂಬಾ ವಿರುದ್ಧ ಗುದ್ದಾಡಿ ಗೆದ್ದ ಬೆಂಗಳೂರು💪🥳
ಅಕ್ಷಿತ್ ಅಬ್ಬರಕ್ಕೆ ಶರಣಾದ ಯು ಮುಂಬಾ 🔥😍#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #BLRvMUM #BengaluruBulls #UMumba pic.twitter.com/uv7dJLo2r0
— ProKabaddi (@ProKabaddi) February 4, 2024
बुल्सचा या मोसमातील हा सातवा विजय असून गुणतालिकेत ते 48 गुणांसह सातव्या स्थानावर आले आहेत. यू मुंबा अजूनही 10 व्या स्थानावर आहे. मुंबई संघाला स्पर्धेतून बाहेर जाण्याचा धोका आहे.
बुल्सच्या विजयात अक्षितनेही महत्त्वाची भूमिका बजावली, ज्याने चार गुणांसह संघाचे पुनरागमन सुनिश्चित केले. अक्षितने 8 गुण मिळवले. मुंबासाठी जय भगवानने 10 गुण मिळवले तर सोमवीरने हाय-5 गुण मिळवले.
#PKLSeason10 : प्रो कबड्डी लीगच्या 10 व्या हंगामात ‘हे’ आहेत टॉप-10 रेडर…
हा सामना सुरजीतच्या 400व्या टॅकल पॉइंटसाठी ओळखला जाईल. बेंगळुरू बुल्सचा अनुभवी खेळाडू सुरजीत सिंगने इतिहास रचला आहे. पीकेएलमध्ये 400 टॅकल पॉइंट पूर्ण करणारा तो पहिला भारतीय आणि लीगच्या इतिहासात ही कामगिरी करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे.