Kangana Ranaut Nomination । हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार कंगना राणावतने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आज कंगना राणावतने उपायुक्त कार्यालय गाठून अर्ज भरला. यावेळी हिमाचल विधानसभेतील विरोधी पक्षनेते जयराम ठाकूरही उपस्थित होते.
अर्ज दाखल करण्यापूर्वी रोड शो Kangana Ranaut Nomination ।
उमेदवारी अर्ज दाखल करण्याअगोदर कंगना राणावतनेही रोड शो केला होता. या जागेवर त्यांची स्पर्धा काँग्रेसचे विक्रमादित्य सिंग यांच्याशी होणार आहे. काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांनी गुरुवारी जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.
विक्रमादित्य सिंह यांनीही दाखल केला अर्ज Kangana Ranaut Nomination ।
विक्रमादित्य सिंह यांनी अर्ज दाखल केला त्यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, काँग्रेसचे प्रदेश प्रभारी राज्यसभा सदस्य राजीव शुक्ला, खासदार प्रतिभा सिंह हेही उपस्थित होते. अर्ज भरण्यापूर्वी विक्रमादित्य सिंह म्हणाले होते, “मी प्रभू रामाच्या नावाने अर्ज भरत आहे.”
भाजपने मंडीमधून अभिनेत्री कंगना राणौतला तिकीट दिले आहे. विक्रमादित्य सिंह हे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र आहेत. त्यांची आई प्रतिभा सिंह आहे, त्या मंडी लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात १ जून रोजी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे.