Pro Kabaddi League 2023-24 : प्रो कबड्डी लीग 2023-24 मध्ये, गतविजेते जयपूर पिंक पँथर्स प्रो कबड्डी लीग (PKL) च्या 10 व्या हंगामाच्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ बनला आहे.
पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे बुधवारी झालेल्या हंगामातील 99व्या सामन्यात जयपूरने तमिळ थलायवाजचा 42-27 असा पराभव केला तर दुसरीकडे बुधवारच्या पहिल्या सामन्यात यजमान आणि तीन वेळचा चॅम्पियन पटना पायरेट्स विरूध्द बेंगळुरू बुल्स याच्यांत लढत झाली, जो सामना 29-29 च्या स्कोअरसह बरोबरीत संपला. या मोसमातील हा नववा सामना बरोबरीत सुटला आहे.
या दोन सामन्यानंतर म्हणजेच प्रो कबड्डी लीगच्या 10व्या हंगामात आतापर्यंत झालेल्या सामन्यांनंतर, जयपूर पिंक पँथर्स 71 गुणांसह प्रो कबड्डी लीग (प्रो कबड्डी 2023) च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे, त्यानंतर 68 गुणांसह पुणेरी पलटण दुसऱ्या स्थानावर आहे. दबंग दिल्ली 59 गुणांसह तिसऱ्या आणि पटना पायरेट्स 53 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. हरयाणा स्टिलर्स 50 गुणांसह पाचव्या क्रमाकांवर आहे.
Panthers first team through to the #PKLSeason10 playoffs 💥🤩
After some fiery action on the mat 🔥 Here’s how the standings look like after the final day of the Patna leg ⚡#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKL #HarSaansMeinKabaddi #PATvBLR #JPPvCHE pic.twitter.com/t3zYwuCwl0
— ProKabaddi (@ProKabaddi) January 31, 2024
दरम्यान, या कबड्डी स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या रेडरला हंगामातील टॉप रेडरचा किताब देण्यात येईल. प्रो कबड्डी लीग 2023-24 च्या 10 व्या हंगामात 99 सामन्यानंतर सध्या जयपूर पिंक पँथर्स संघाचा अर्जुन देशवाल हा 191 रेड पॉइंट्ससह टॉप रेडर आहे. यापूर्वीच्या म्हणजेच पीकेएल सीझन 9 मध्ये जयपूर पिंक पँथर्सचा अर्जुन देशवाल हाच टॉप रेडर होता. देशवालने त्यावेळी 296 रेड पॉइंट्स मिळवले होते.
#PKLSeason10 (#PATvBLR Match 99) : तमिळ थलायवाजचा पराभव करत जयपूर पिंक पँथर्सची प्ले-ऑफमध्ये धडक…
प्रो कबड्डी 2023 : टॉप 10 रेडर
1. अर्जुन देशवाल (जयपूर पिंक पँथर्स) : 17 सामने 191 गुण
2. आशू मलिक (दबंग दिल्ली केसी) : 16 सामने 168 गुण
3. गुमान सिंह (यू मुंबा) : 16 सामने 151 गुण
4. पवन सहरावत (तेलुगु टायटन्स) : 16 सामने 146 गुण
5. मनिंदर सिंह(बंगाल वाॅरियर्स) : 15 सामने 146 गुण
6. सचिन(पटना पाइरेट्स) : 17 सामने 133 गुण
7. नरेंदर(तमिल थलाइवाज) : 16 सामने 133 गुण
8. परदीप नरवाल (युपी योध्दाज) : 16 सामने 122 गुण
9. अंजिक्य पवार( तमिल थलाइवाज) : 17 सामने 118 गुण
10. नितिन कुमार (बंगाल वाॅरियर्स) : 14 सामने 112 गुण