“राज्यात महायुती ‘एवढ्या’ जागा जिंकणार” ; रोहित पवारांनी सांगितला आकड्यांचा खेळ

Rohit Pawar on Election। देशात सध्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. त्यातच राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. याच अंदाजात आता कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीदेखील अंदाज व्यक्त करत राज्यातील जागांची आकडेमोड केलीय.
नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत रोहित पवार बोलत होते. त्यांनी,”महायुती व मित्र पक्षाकडून मोठ्या निवडणुकीत पैशाचा वाटप सुरु आहे. बारामती , अहमदनगरनंतर आणि आता नाशिकमध्ये महायुती पैशाचे वाटप करत आहे. महायुती राज्यात निवडणुकीत 2 हजार कोटी रुपये खर्च करत आहे. एकट्या बारामतीत 150 कोटी खर्च करण्यात आलेत.
बावनकुळे यांचा विचाराचा फुगा फुटला Rohit Pawar on Election।
चंद्रशेखर बावनकुळे यांचाच विचाराचा आता फुगा फुटला आहे. फोडाफोडीचे राजकारण व राजकारणाचा घसरत चाललेला स्थर हे भाजपच्या मतदारांना आवडलेले नाही. त्यामुळे भाजपचे मतदार बाहेर न निघाल्याने मताचा टक्का घसरला आहे, याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे. आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्हाला अँटी करप्शन मोहीम हाती द्यावी लागेल, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.
महायुतीला मिळणार ‘एवढ्या’ जागा Rohit Pawar on Election।
महाराष्ट्रात महायुतीला किती जागा मिळणार यावर रोहित पवार यांनी वक्तव्य केले आहे. भारतीय जनता पक्षाला 13 ते 14 जागा, शिवसेना शिंदे गटाला 2 ते 3 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही, एकूण महायुतीला 16 ते 18 जागा मिळतील, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
पैसे वाटपाच्या आरोपावरून आरोप-प्रत्यारोप
दरम्यान, अहमदनगर लोकसभा मतदारसंघात उन्हाळ्यातही पैशांची धुवांधार बरसात होत असल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला होता. या संदर्भात त्यांनी एका पोस्टच्या माध्यमातून एक व्हिडिओ देखील पोस्ट केला. गावागावात पाकीट वाटले जात असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री नाशिकमध्ये आले असताना त्यांनी पैशांच्या बॅगा भरून आणल्याचा आरोप केला. पैसे वाटपाच्या आरोपावरून महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसून आले.





